Saturday, 1 December 2012

नवे शिवसेनाप्रमुख कोण?


नवे शिवसेनाप्रमुख कोण?

sin.jpg

  नवे शिवसेनाप्रमुख कोण ?... बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तमाम शिवसैनिक आणि अवघ्या महाराष्ट्राला पडलेला हा लाखमोलाचा प्रश्न ! या प्रश्नाचे उत्तर अखेर उद्या मिळणार आहे . शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ' सामना ' तून शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे स्वत : याबाबतची घोषणा करणार आहेत .

१९६६
साली शिवसेना नावाच्या झंझावाताचा जन्म झाल्यापासून बाळासाहेबांनी शिवसेनेचे निर्विवाद नेतृत्व केले . शिवसेनेच्या ४५ वर्षांच्या वाटचालीत बाळासाहेबांच्या नेतृत्वावर कोणीही बोट दाखवू शकला नाही . शिवसेनेतील सोडाच ; पण शिवसेना सोडून गेलेला कोणताही नेता बाळासाहेबांच्या नेतृत्वाला कधीही उघडपणे आव्हान देऊ शकला नाही . बाळासाहेबांना तहहयात शिवसेनाप्रमुखपद बहाल करण्यात आले होते . मात्र , ती केवळ औपचारीकता होती . शिवसैनिकांसाठी शिवसेनाप्रमुख आणि बाळासाहेब हे समानार्थी शब्द होते .

आपल्या
कर्तृत्वाने बाळासाहेबांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेले हे पद त्यांच्यानंतर कोण स्विकारणार ? पुढले शिवसेनाप्रमुख कोण होणार ? याबाबत म्हणूनच प्रचंड उत्सुकता आहे . ही उत्सुकता उद्या संपणार आहे . बाळासाहेबांच्या निधनानंतर डिसेंबरपासून प्रथमच उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत . त्यानिमित्ताने ते पक्षाच्या मुखपत्राला जाहीर मुलाखत देणार असून त्यात शिवसेनाप्रमुखपदाचे रहस्यही उलगडणार आहेत .

No comments:

Post a Comment