Saturday, 1 December 2012

देश 'सोनिया की चिडिया' होतोय!


देश 'सोनिया की चिडिया' होतोय!

 sidhu.jpg

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले माजी क्रिकेटपटू भाजपचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या जबरदस्त वर्त्कृत्वाने काँग्रेसला अक्षरश : घायाळ करून टाकले आहे . ' सोन्याची चिडिया ' म्हणून ओळखलेल्या जाणा - या भारताला ' सोनिया की चिडिया ' बनविण्याचा डाव काँग्रेसने आखला आहे ,' अशी बोचरी टीका सिद्धूने केली आहे .

गुजरात हिमाचल प्रदेशातील निवडणुकीच्या प्रचारासाठी ' बिग बॉस ' या टिव्ही मालिकेतून बाहेर पडलेल्या सिद्धूने शुक्रवारी अहमदाबाद येथे प्रचारसभा घेतली . यावेळी बोलताना सिद्धूने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी , पंतप्रधान मनमोहन सिंग भाजपचे बंडखोर केशुभाई पटेल यांचे वाभाडे काढले . ' मनमोहनसिंग हे ' बेअसरदार सरदार ' आहेत . ते अर्थशास्त्री नसून व्यर्थशास्त्री अनर्थशास्त्री आहेत ,' अशा शब्दांत सिद्धूने पंतप्रधानांची खिल्ली उडवली .

भाजपविरोधात बंड करून स्वतंत्र पक्ष स्थापन करणा - या केशुभाई पटेल यांच्यावरही सिद्धूने हल्लाबोल केला . ' केशुभाई पटेल हा फुसका फटाका आहे . वाया गेलेल्या या काडतूसचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही ,' असा जोरदार टोलाही सिद्धने हाणला .

ही भावी पंतप्रधानाची निवडणूक

सिद्धूने नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महात्मा गांधी यांच्याशी केली आहे . ' गांधीजींचे नाव जसे आजही सर्वांच्या ह्दयात आहे , त्याचप्रमाणे मोदींचे नाव गुजराती जनतेच्या ह्दयात आहे , असे सांगतानाच , ' ही निवडणूक गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची नाही तर देशाच्या भावी पंतप्रधानाची आहे . याची जाणीव ठेवून मतदान करा ,' असे आवाहनही त्याने केले .

No comments:

Post a Comment