Saturday, 1 December 2012

उद्धव ठाकरे सोमवारपासून राज्याच्या झंझावाती दौर्‍यावर

उद्धव ठाकरे सोमवारपासून राज्याच्या झंझावाती दौर्‍यावर



हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर शिवसेना कार्यप्रमुख श्री. उद्धव ठाकरे प्रथमच महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार आहेत. सोमवार, ३ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या या दौर्‍यात उद्धव ठाकरे विभागवार बैठका घेणार आहेत.
या बैठकांना संबंधित विभागातील सर्व शिवसेना उपनेते, आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, जिल्हा परिषद पदाधिकारी, नगरसेवक, माजी आमदार व खासदार तसेच जिल्हा ते तालुकास्तरांपर्यंतचे युवा सेनेचे पदाधिकारी यांच्याशी उद्धव ठाकरे संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. या दौर्‍यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुभाष देसाई, डॉ. मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते व रामदास कदम हे शिवसेना नेते उपस्थित राहणार आहेत............................

No comments:

Post a Comment